दिनविशेष समिती
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला विविध पैलू पाडण्यासाठी अनेक समित्या कार्यरत आहेत. दिनविशेष समिती ही यापैकी एक आहे. भारत हा सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध देश असल्यामुळे या व्यापक संस्कृतीची विविध दिन साजरे करून विद्यार्थ्यांना ओळख करून देण्याचा या समितीचा प्रयत्न असतो.
या समितीची उद्दिष्टे खालील प्रमाणे…
- विद्यार्थ्यांना विविध विशेष दिनांची ओळख करून देणे. उदाहरणार्थ गुरुपौर्णिमा, शिक्षक दिन, वाचन प्रेरणा दिन
- विद्यार्थ्यांना त्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी देऊन त्यांच्यातील नियोजन कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य, सादरीकरण कौशल्य, वक्तृत्व कला इत्यादी कौशल्यांचा विकास करणे.
- सामाजिक समृद्धीच्या दृष्टीने मुलींचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करणे. उदाहरणार्थ सावित्रीबाई फुलेंची जयंती बालिका दिन म्हणून साजरी करून मुलींना त्यांच्या क्षमतांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला जातो.
- सामान्यांना दर्जेदार जीवन जगण्याचा हक्क आहे याची जाणीव करून देणारे दिन साजरे करणे. उदाहरणार्थ जागतिक अल्पसंख्यांक दिवस.
श्रीम. व्ही. एस. कुलकर्णी (समन्वयक)
९४२३०५०२३०
- श्रीम. के. ए. देवकुळे
- श्रीम. आर. एस. शिर्के
- श्रीम. एम. एस. लांजेकर
- श्रीम. पी. एस. सुर्वे
- श्रीम. के. एस. यादव
- श्री. व्ही. व्ही. शिंदे