वाङ्मय मंडळ
वाङ्मय मंडळाची प्रमुख उद्दिष्टे
- विविध भाषांचे संवर्धन करणे.
- प्रत्येक भाषेतील साहित्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आदर आणि रुची निर्माण करणे.
- विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विविध साहित्य प्रकारांबद्दल आवड निर्माण करणे. त्याच्या वाचनासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे. आणि विविध कार्यक्रमांद्वारे सदर साहित्य प्रकारांचे दर्शन (ओळख)
- साहित्याच्या अनुषंगाने जे विविध कलाप्रकार निर्माण होतात त्याची ओळख विद्यार्थ्यांना करून देणे.
- वक्तृत्व, कथाकथन, निबंध लेखन, एकांकिका लेखन, उत्तम हस्ताक्षर इत्यादी विविध कला कौशल्यांना वैर्धिष्णू करणे.
- साहित्यातील उत्तम कलाकृती वाचनाची प्रेरणा देऊन त्यांच्या बौद्धिक क्षमतांचा विकास करणे.
- साहित्यिक भेटीद्वारे विद्यार्थ्यांच्या साहित्य विषयक आवडीच प्रोत्साहन देणे. त्याद्वारे त्यांच्या समोर नमुना दाखल उत्तम साहित्यिक व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडविणे.
- विविध भाषिक कौशल्यांचा विकास साधताना विद्यार्थ्यांवर सर्जनाचे संस्कार करणे. त्यायोगे जीवनकौशल्ये आणि मूल्यांचा परिपोष होईल असे पहाणे.
- श्रवण,भाषण-संभाषण,वाचन,लेखन,भाषाभ्यास अशा कौशल्यांना वाढीस लावणे.
अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील वाङ्मय मंडळ वरील उद्दिष्टानुरुप सातत्याने विविध उपक्रमांचे नियोजन करत असते. साहित्यिक, सांस्कृतिक गुण संवर्धनाबरोबरच व्यक्तिमत्व विकासाची संधी विद्यार्थ्यांना मिळावी. त्यायोगे विविध गुणांचे परिपोषण ठरावे या हेतूने वाङ्मय मंडळ कार्यरत असते. महाविद्यालयातील होणाऱ्या विविध स्पर्धांना भाग घेण्याची संधी देऊन एक उत्तम व्यासपीठ विद्यार्थ्यांना मिळते. अंतर्गत स्पर्धांखेरीज जिल्ह्यात होणाऱ्या विविध स्पर्धांना जसे की, वक्तृत्व, कथाकथन, अभिवाचन, निबंधलेखन, काव्यलेखन अशा विविध स्पर्धांना विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून पाठविले जाते. त्याद्वारे त्यांच्या अनुभव विकासनाची उत्तम संधी प्राप्त होते आणि संधी व्यक्तिमत्व विकासाची दारे खुली करत असतात. वाङ्मयीन अभिरुची बरोबरच व्यक्तिमत्व विकास हे उद्दिष्ट दृष्टीसमोर ठेवून वाङ्मय मंडळाकडून विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. महाविद्यालयीन विश्वात खूप जुनी परंपरा असलेले वाङ्मय मंडळ नित्यनूतन रूपाने वाटचाल करते आहे.
डॉ. एस. आर. शिंदे (समन्वयक)
८६०५९८०९८०
- श्री. बी. व्ही. रानडे
- श्रीम. एस. एस. टोळ्ये
- श्री. डी. डी. सरदेसाई
- श्रीम. ए. ए. बुड्ये