सांस्कृतिक मंडळ समिती
सांस्कृतिक विभागाच्यावतीने विविध उपक्रमांचे/ कार्यक्रमांचे आयोजन कनिष्ठ महाविद्यालयात केले जाते. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या कलागुणांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे तसेच विद्यार्थ्यांमधील विविध अभिजात कलांची ओळख व्हावी हा सांस्कृतिक विभागांतर्गत वर्षभरात घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचा उद्देश असतो.
सदर २०२४ – २०२५ या ही शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक मंडळ स्थापन झाले. महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक मंडळाचे नियोजनबद्ध काम होण्यासाठी अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर सर व उपप्राचार्य श्री. सुनील गोसावी सर यांचे अमूल्य मार्गदर्शन मिळाले.
विद्यार्थ्यांचे अभ्यासासोबत, अभ्यासेत्तर उपक्रमामध्ये प्रगती घडवून आणणे हे या सांस्कृतिक मंडळाचे उद्दिष्ट असते. त्याचबरोबर गायन, वाद्य, नृत्य आणि नाट्य या अभिजात कलांची ओळख व्हावी व विद्यार्थ्यामधील विश्वास आणि सादरीकरणाचे कौशल्य विकसित व्हावे तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ओळख व्हावी यासाठी वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे हाच या सांस्कृतिक मंडळाचा मुख्य उद्देश असतो.
सांस्कृतिक मंडळाची प्रमुख उद्दिष्टे
- विद्यार्थ्यांमधील अभ्यासेत्तर कलागुणांना वाव देणे.
- अभ्यासाबरोबर अभ्यासेत्तर गुणवैशिष्टे सादर करून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवणे. साधारणपणे – गायन, वादन, अभिनय, स्कीट लिहिणे, स्कीटचे सादरीकरण करणे, कथा लिहिणे, मिमिक्री, उभय स्तरावरील हास्यास्पद विनोद लिहिणे आणि सदर करणे, नकला इत्यादी. अशा विविध विधायक व चांगल्या गुणांना एक छानस व्यासपीठ उपलब्ध करून देणे हेच या मंडळाचे मुख्य वैशिष्टे आणि उद्दिष्ट आहे.
सदर वर्षभरामध्ये आमच्या मंडळाने उपप्राचार्य यांच्या मार्गदर्शनानुसार खालील उपक्रम घेण्याचे ठरविले आहे.
- १५ ऑगस्ट २०२४ रोजी “ देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन” करण्याचे ठरले आणि यासाठी विद्यार्थ्याकरिता विशेष सूचनापत्रक काढणे आणि तसेच महाविद्यालयामधील सर्व विभागातील विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणे. या स्पर्धेसाठी आलेल्या विद्यार्थ्याची नोंद करून त्यांना सभासद करून घेणे. समूह गीत गायन स्पर्धेची विद्यार्थ्याकडून तयारी करून घेणे आणि नियोजनबद्ध आखणी करणे.
- स्कीट मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्याचे ठरले. त्यासाठी मुख्यवक्ता म्हणून श्री राजन मलुष्टे यांची नेमणूक करण्यास आली.
विद्यमान वर्षाच्या विविध स्पर्धां व महाविद्यालयाचा वार्षिक ‘छंदोत्सव’ हा सांस्कृतिक मंडळाअंतर्गत अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात राबविला जातो. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन आपल्या विविध कलाकौशल्याचे प्रदर्शन करत असतात. विद्यार्थ्याचा उत्साह पाहण्यासारखा असतो.
श्री. एन. एन. गोडबोले (समन्वयक)
९९६००५३५९४
- श्रीम. एस. एस. फळणीकर
- श्रीम. एम. एम. लेले
- श्रीम. ए. बी. टिकेकर
- श्रीम. व्ही. एस. मालगुंडकर
- श्री. के. एस. नाईक
- श्री. व्ही. व्ही. शिंदे