अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील एमसीव्हीसी विभागाची इंडस्ट्रियल व्हिजिट संपन्न
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकरकुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील एम. सी. व्ही. सी. विभागातील लॉजिस्टिक्स अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट तसेच अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट मधील विद्यार्थ्यांनी दिनांक 18 जून 2025 रोजी रत्नागिरीतल्या एमआयडीसी मधील प्रतिथयश उद्योजक श्री. राजेंद्र सावंत यांच्या नवलाई ग्रुप्स ‘ला भेट देऊन तेथील रेडी मिक्स काँक्रीट संबंधीच्या कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
श्री. प्रथम सावंत आणि एमसीव्हीसी चे माजी विद्यार्थी श्री.सार्थक सावंत या उभरत्या उद्योजकांनी बदलत्या व्यावसायिक वातावरणाशी जुळवून घेताना उद्योजकांनी स्वतःमध्ये बदल करणे कसे आवश्यक आहे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी अकाउंटिंग, परचेसिंग, सेलिंग ,ट्रान्सपोर्टेशन याविषयीचे वर्गात मिळणारे ज्ञान एखादा व्यवसाय चालवताना कसे वापरावे याचे प्रात्यक्षिक या दोन्ही व्यावसायिकांनी विद्यार्थ्यांना समजावले. याचबरोबर प्लांट ऑपरेशन, क्वालिटी टेस्टिंग आणि स्टोअर्स ऑपरेशन यांची देखील संपूर्ण माहिती दिली. तसेच व्यवसायात जोखीम स्वीकारताना योग्य निर्णय क्षमता स्वतःमध्ये विकसित करणे खूप गरजेचे असते हे व्यवसायाची सर्व अंग स्पष्ट करताना खूपदा अधोरेखित केले.
यानंतर एक्झॉटिक फ्रुट प्रायव्हेट लिमिटेड इथे भेट दिली. तेथील श्री. पुराणिक यांनी विद्यार्थ्यांना तेथील व्यावसायिक कामकाजाची माहिती दिली.
एमसीव्हीसी विभागाचे विभाग प्रमुख श्री. श्रीकांत दुदगीकर, शिक्षिका सौ. गायत्री पवार आणि रिद्धी हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी पूर्णवेळ सर्व प्रात्यक्षिके उत्साहाने अनुभवली आणि सर्व व्यावसायिक कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे इंडस्ट्रियल व्हिजिट चा मुख्य हेतू साध्य झाला.