एम. सी.व्ही.सी. विभागातील इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी शाखेतील १२ वीच्या विद्यार्थ्यांची एज्युकेशनल व्हिजिट
एम. सी.व्हि.सी. विभाग
इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी शाखा
शनिवार दिनांक २१ जून २०२५ रोजी एम. सी.व्हि.सी. विभागातील इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी शाखेतील १२ वीच्या विद्यार्थ्यांची एज्युकेशनल व्हिजिट JIO टाॅवर एम आय डि सी रत्नागिरी येथे नेण्यात आली.
मोबाईल सर्व्हिस आणि वायफाय सर्व्हिस ज्या मेन JIO सर्व्हर च्या जवळच असलेला JIO टाॅवर येथुन सिग्नल रत्नागिरी सिटी मध्ये देण्यात येतो या ठिकाणी विद्यार्थ्यांना एज्युकेशनल व्हिजिट साठी नेण्यात आले होते. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना नेटवर्किंग ची माहिती देण्यात आली जसं की जेव्हा ऑप्टिकल फायबर मधून सिग्नल येतो त्यावेळेला कोणत्या प्रकारच्या केबल्स वापरल्या जातात किंवा ज्या वेळेला ऑप्टिकल फायबर केबल टाकणं शक्य नसेल त्यावेळी रेडिओ फ्रिक्वेन्सी च्या माध्यमातून दोन टॉवर मध्ये सिग्नल कसे पोहोचवण्यात येते, तसंच एखाद्या गावात त्या टॉवरची क्षमता बॅन्डविडथच्या माध्यमातून कशी स्थिर ठेवण्यात येते. जेव्हा पूर्ण नेटवर्क जाते म्हणजे नेमक काय होतं किंवा त्या टॉवरला आवश्यक असलेले वेगवेगळे पाॅवर सप्लाय जसे कि ट्रान्सफॉर्मर त्याला असलेला बॅकअप जनरेटर त्याला असलेला पॉवर बॅकअप. विविध प्रकारचे नेटवर्किंग स्विच कशा पद्धतीने हाताळण्यात येतात , टॉवर किंवा फायबर ऑप्टिक केबल च्या माध्यमातून सिग्नल कशा प्रकारे ट्रॅव्हल होतात याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
हे मार्गदर्शन करण्यासाठी जिओ नेटवर्कचे सीनियर इंजिनियर श्री कांबळे , ज्युनिअर इंजिनियर श्री. प्रशांत कानडे, टेक्निशियन श्री.अक्षय शिंदे हे आवर्जून हजर होते तसेच यावेळी एम. सी.व्हि.सी. विभागातील इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी शाखेचे बारावीचे विद्यार्थी, प्राध्यापक श्री. प्रसाद गोखले , प्राध्यापक श्री.योगेशानंद हळबे उपस्थित होते.