अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये “सामाजिक न्याय दिन” साजरा

सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण रत्नागिरी यांच्या परिपत्रकानुसार गुरुवार दि. २६ जून 2025 रोजी महाविद्यालयामध्ये सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्यकाळात सामाजिक न्याय प्रस्थापनेसाठी सदैव दक्ष होते. समाजातील दुर्लक्षित मागासवर्गीय, अपंग, वृद्ध, निराधार, दुर्बल इत्यादी घटकांच्या कल्याणार्थ त्यांनी अनेक निर्णय आमलात आणले. त्यांचा आदर्श विशेषत्वाने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा आणि समाज परिवर्तनाची योग्य दिशा त्यांना मिळावी हा या कार्यक्रमामागील प्रमुख हेतू . या निमित्ताने महाविद्यालयात “सामाजिक न्याय संकल्पना आणि वर्तमान भारतीय समाज” या विषयावर डॉ. शिवाजी उकरंडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते बोलताना म्हणाले की राष्ट्रनिर्मितीसाठी शिक्षण महत्वाचं आहे. राष्ट्र एक धारणा आहे, त्यासाठी आस्था लागते. “Nation is Notion” – सामाजिक न्याय म्हणजे सर्व प्रकारच्या भेदांच्या पलीकडे जाऊन उपाय शोधणारा एक सर्व समावेशक विचार त्यामुळे विद्यार्थ्यांना सामाजिक समतेचा उत्तम पाठ मिळाला. तसेच व्याख्यानाचा समारोप करताना त्यांनी अजूनही सामाजिक न्याय व्यवस्था बळकट झालेली नाही. ती करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्याचा उपयोग राष्ट्रनिर्मितीसाठी होईल त्यामुळे विद्यार्थ्यांनी यासाठी योग्य ते प्रयत्न करावेत असे आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य श्री. सुनील गोसावी यांनी  शाहू महाराजांचा आदर्श ठेवून सामाजिक कल्याण साधण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन दिनविशेष समारंभ समिती प्रमुख सौ. मनस्वी लांजेकर व सर्व समिती सदस्यांनी केले. सूत्रसंचालन श्री दिलीप जाधव यांनी केले तर सौ प्राजक्ता सुर्वे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

social-justice-day-2025
Scroll to Top