रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात संपन्न

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी दिनविशेष समितीतर्फे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी लेख, त्यांचे चित्र तसेच विद्यार्थ्यांच्या दैनंदिन आयुष्यातील शिक्षकांचे महत्त्व पटवून देणारे लेख भित्तिपत्रकाच्या माध्यमातून कला, विज्ञान, वाणिज्य आणि एमसीवीसी या चारही विभागांमध्ये प्रदर्शित करण्यात आले.उपप्राचार्य श्री. सुनील गोसावी, पर्यवेक्षक श्री. विद्याधर केळकर तसेच चारही विभागांचे प्रमुख  आणि लेखन करणारे विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे नियोजन माननीय प्राचार्य डॉ.मकरंद साखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनविशेष समितीच्या प्रमुख सौ. मनस्वी लांजेकर आणि इतर सर्व सदस्यांनी केले.

Scroll to Top