शास्त्र शाखा

अवकाशविषयक अभ्यासाला चालना देण्यासाठी खगोल अभ्यास केंद्रामार्फत अवकाश निरीक्षण , भित्तीपत्रक स्पर्धा असे उपक्रम राबविले जातात.
प्रतिवर्षी विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक विषयावर आधारित भित्तीपत्रके तयार करण्याची स्पर्धा घेण्यात येते व त्या सर्व भित्तीपत्रकांचे प्रदर्शन आयोजित केले जाते.

छंदोत्सवाअंतर्गत विज्ञान विभागामार्फत खालील स्पर्धा आयोजित करण्यात येतात:

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान प्रात्यक्षिकविषयक रुची वाढविण्यासाठी  विज्ञान विभागाच्या सर्व प्रयोगशाळांमध्ये वैज्ञानिक उपकरणे, जीवशास्त्रीय नमुने, काही नाविन्यपूर्ण प्रयोग, इत्यादींचे प्रदर्शन आयोजित केले जाते.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक आकृत्या व संज्ञा याविषयी उत्सुकता निर्माण करण्याकरिता विज्ञान आधारित रांगोळी स्पर्धा आयोजित केली जाते.

वैज्ञानिक विषयानुसार चित्रकला स्पर्धेचे आयोजन

विद्यार्थ्यांनी (स्थानिक) निसर्गातील स्वतः घेतलेली छायाचित्रांचे प्रदर्शन

विद्यार्थी आणि शिक्षक या दोन गटांमध्ये स्पर्धा आयोजित केली जाते.

विज्ञान दिन- २८ फेब्रुवारी निमित्त विद्यार्थ्यांसाठी  विज्ञान शैक्षणिक साहित्य स्पर्धा घेण्यात येते.

गरजू विद्यार्थ्यांचा गट तयार करून वरील परीक्षेसंदर्भामध्ये विषयानुसार मार्गदर्शन केले जाते.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तज्ञ संशोधक व्यक्तींचे व्याख्यान आयोजित केले जाते.

विद्यार्थ्यांकरिता क्षेत्रभेटीचे आयोजन करून खारफुटी संदर्भात माहिती देण्यात येते.

भारतातील  व जगातील व्याघ्र प्रकल्पांची माहिती देवून विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीसाठी प्रोत्साहित केले जाते.

उदा. गोरेवाडा / ताडोबा अभयारण्य.

निसर्ग मंडळामार्फत विविध वनस्पतींची (जैवविविधता) माहिती व्हावी म्हणून अभ्यास सहल आयोजित केली जाते.

वन्यजीव संरक्षण दिन (४ डिसेंबर) अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वन्यजीवांविषयी जाणीव निर्माण व्हावी म्हणून पूर्ण आठवड्यामध्ये व्याख्याने, ध्वनीचित्रफित, चित्रकला इत्यादीचे आयोजन केले जाते.

जीवशास्त्र विभागाच्या ग्रंथालयामध्ये पाठ्यपुस्तके, विविध परीक्षांकरिता उपयुक्त संदर्भपुस्तके, इत्यादी एकूण ४०० पुस्तके विद्यार्थ्यांना देवघेवीकरिता उपलब्ध आहेत.

Scroll to Top