इंजिनीयरांचे इंजिनियर - छत्रपती शिवाजी महाराज - श्री. अविनाश हळबे

अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील इतिहास शोध आणि बोध अभियान मंडळामार्फत व्याख्यान आयोजित करण्यात आले; यावेळी श्री अविनाश हळबे पुणे यांनी या व्याख्यानात छत्रपती शिवाजी महाराजांचे इंजिनिअरिंग क्षेत्रातील विविध पैलू स्पष्ट करून सांगितले.
 
 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. निनाद तेंडुलकर यांनी केले आणि मान्यवरांचे स्वागत केले. प्रमुख व्याख्या त्यांचा परिचय कु. श्रावणी खांडेकर हिने ओघवत्या शब्दात करून दिला.
 
व्याख्यानात श्री अविनाश हळबे यांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख आणि विविध पैलूंचे महत्त्व त्यांच्या व्याख्यानातून समजावून दिले.
 
 हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जी ध्येये ठेवली होती व त्याप्रमाणे आपल्या धोरणांची निश्चिती केली होती याचे उदाहरणांसह स्पष्टीकरण दिले.  
 
इंजीनियरिंगच्या क्षेत्रात कोणत्याही उद्योगाचा विकास करायचा असेल तर चार M म्हणजे मॅन (मनुष्यबळ), मशीन (उत्पादक यंत्रे), मटेरियल (कच्चा माल), मेथड (कार्यपद्धती) S – सेफ्टी(सुरक्षितता), E – इन्व्हरमेंट (पर्यावरण) या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याची पूर्तता छत्रपती शिवाजी महाराजांनी केली हे उदाहरण देऊन स्पष्ट केले. 
 
अध्यक्षीय समारोपात कला शाखेचे विभाग प्रमुख प्रा. वैभव कानिटकर यांनी शिवरायांच्या कारकिर्दीचे वर्णन करत असताना विद्यार्थ्यांना सांगितले की तुमच्या आयुष्याची लांबी महत्त्वाची नसून तुमच्या आयुष्याची खोली महत्त्वाची आहे.
 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पूर्वा शिरगावकर हिने केले तर सर्व मान्यवरांचे आभार कु. विदुला कुलकर्णी हिने मानले. या कार्यक्रमाला इतिहास शोध आणि बोध अभियान मंडळाचे सदस्य विद्यार्थी तसेच प्रा.दत्तात्रय माळवदे, प्रा. दिलीप जाधव, प्रा. गुरुप्रसाद लिंगायत, प्रा. अपर्णा तगारे, प्रा. राजेश कांबळे उपस्थित होते. 
 
हा कार्यक्रम कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य प्रा.सुनील गोसावी आणि पर्यवेक्षक प्रा  विद्याधर केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
Scroll to Top