अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील पर्यावरण जाणीव जागृती अभियान मंडळाची नारायणमळी येथील कांदळवनास भेट

अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील पर्यावरण जाणीव जागृती अभियान मंडळाची निसर्ग भ्रमण फेरी आज दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ रोजी नारायण मळी येथील कांदळ वनात नेण्यात आली. सदर निसर्ग भ्रमण फेरीत महाविद्यालयातील ५७ विद्यार्थी विद्यार्थिनी विद्यार्थी तसेच पर्यावरण मंडळातील सौ पाथरे मॅडम, श्री भूषण केळकर सर, श्री ताम्हणकर सर व श्री नागवेकर सर हे शिक्षक सहभागी झाले होते.

या निसर्गभ्रमण फेरीसाठी कांदळवन कक्ष रत्नागिरी येथील प्रकल्प सहसंयोजक श्री स्वस्तिक गावडे यांनी विद्यार्थ्यांना कांदळवन परिसंस्थेची माहिती देऊन कांदळवन संरक्षणाबद्दल माहिती दिली
Scroll to Top