अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये राष्ट्रभाषा हिंदी दिन संपन्न
मंगळवार दिनांक24 सप्टेंबर रोजी महाविद्यालयामध्ये राष्ट्रभाषाहिंदी दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित मान्यवर कला विभाग प्रमुख श्री. वैभव कानिटकर , हिंदी विषयाचे प्रमुख श्री. दिलीप सरदेसाई , हिंदी विषय शिक्षिका सौ. साळवी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमा मध्ये तीनही विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे काव्यवाचन, शेरोशायरी, कथा वाचन केले. विषय प्रमुख श्री सरदेसाई यांनी आजच्या काळामध्ये हिंदी विषय किती आणि कसा महत्त्वाचा आहे हे सांगितले. याचबरोबर या विषयामध्ये पदवी संपादन केल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या नोकरीच्या संधीं विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच हिंदीचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करावा असे विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच हिंदीचा वापर चित्रपट, जाहिरात एजन्सी या विविध क्षेत्रामध्ये हिंदीचा वापर भरपूर प्रमाणात करण्यात आला आहे. याचाही त्यांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला. त्यानंतर श्री. कानिटकर यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये हिंदी विषयाच्या प्रचार प्रसारची आजच्या काळातील गरज,हिंदी विषयाला असलेले महत्त्व विद्यार्थ्यांना विविध उदाहरणातून पटवून दिले. तसेच हिंदी भाषा ही भारतामध्ये बोलली जाणारी बहुभाषांपैकी एक भाषा आहे. जवळपास 60 % लोक हिंदी भाषेचा वापर करतात हे देखील त्यांनी सांगितले.ते पुढे बोलताना म्हणाले हिंदी भाषा ही प्रेमाची आणि आपुलकीची भाषा आहे. असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मकरंद साकळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या शिक्षकांच्या मदतीने हा कार्यक्रम अतिशय उत्तम रित्या संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अभिजीत भिडे यांनी केले.