अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये स्वच्छता अभियान संपन्न
शासनाच्या आदेशानुसार दिनांक १४ सप्टेंबर ते ०१ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत “स्वच्छता ही सेवा” या पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या उपक्रमांतर्गत अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शनिवार दिनांक २८ सप्टेंबर २०२४ रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
मा. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आणि उपप्राचार्य श्री. सुनील गोसावी तसेच पर्यवेक्षक श्री. विद्याधर केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकरावी आणि बारावीच्या सर्व वर्गांच्या विद्यार्थ्यांनी, वर्गशिक्षक आणि सहकारी शिक्षक यांनी नियोजन करून महाविद्यालयाच्या वर्ग खोल्या आणि परिसराची स्वच्छता केली. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व कळावं आणि स्वच्छतेची जाणीव निर्माण व्हावी ह्या हेतूने हा उपक्रम राबविला गेला.सर्व विभाग प्रमुखांनी प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना वर्ग आणि इतर परिसर स्वच्छतेसंबंधी मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या.