विचारांना कृती ची जोड देणे म्हणजे गांधीवाद – प्रा. निलेश पाटील
अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे २ ऑक्टोबर २०२४ रोजी महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंतीच्या निमित्ताने श्रमदान व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षक प्रा.विद्याधर केळकर, प्रमुख व्याख्याते प्रा.निलेश पाटील, व कार्यक्रमाधिकारी प्रा निनाद तेंडुलकर, प्रा.स्मिता पाथरे, प्रा.अभिजित भिडे, प्रा.स्नेहा बाणे उपस्थित होते.
याप्रसंगी एन एस एस च्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरामध्ये एक तास स्वच्छता व श्रमदान केले. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी ‘महात्मा गांधीजींचे विचार’ या विषयावर गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. निलेश पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानात सरांनी गांधीजींचे विचार ओघवत्या शैलीत कथन केले. अहिंसा, सत्याग्रहाच्या तत्त्वावर कायम राहत गांधीजींनी राष्ट्रीय चळवळ आकाराला आणली. गांधीजींनी तळागाळातील लोकांचा विचार केला. वर्णभेद, रंगभेद यांचा विरोध केला. गांधीजींनी साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा अंगीकार केला. श्रम प्रतिष्ठेचा आदर करून त्यात द्वेषाची भावना नसते हे समजावून दिले. गांधीजींनी पोटतिडकीने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. खेड्यांचे महत्त्व सांगताना गांधीजी म्हणत ग्रामराज्य ते रामराज्य हा प्रवास शक्य आहे. आरोग्याविषयी गांधीजी सजग होते त्यांनी आयुर्वेदातील उपवासाचे महत्त्व जाणले होते. गांधीजी अर्थ विचारवंत, स्वच्छतेचे उपासक, सर्वधर्मसमभावाचे प्रणेते, राष्ट्रपिता होते अशा अनेक गुणांचा परिचय सरांनी करून दिला.
अध्यक्षीय भाषणात पर्यवेक्षक प्रा.विद्याधर केळकर यांनी महाविद्यालय परिसरात केलेल्या श्रमदानाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले व गांधीजींनी स्वावलंबन, स्वच्छता, स्वदेशी हे गुण आपल्या अंगी बाणवले व नंतर इतरांना उद्देश केला असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अभिजित भिडे यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय कु. निशिता पवार हिने करून दिला. सूत्रसंचालन कु. सेजल सावंत हिने केले तर आभार कु. सायली कोतापकर हिने मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाधिकारी प्रा निनाद तेंडुलकर, प्रा.स्मिता पाथरे, प्रा.अभिजित भिडे, प्रा.स्नेहा बाणे यांनी प्रयत्न केले.