अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 'शिक्षण सप्ताह' उत्साहात साजरा

रत्नागिरी, 28 जुलै: दि. 22 जुलै ते 28 जुलै या दरम्यान अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ‘शिक्षण सप्ताह’ उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या या उपक्रमामध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने सहभाग नोंदवला.

या सप्ताहा दरम्यान अध्ययन अध्यापन साहित्य दिवस, मूलभूत संख्याज्ञान आणि साक्षरता दिवस, क्रीडा दिवस, सांस्कृतिक दिवस, कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस, इको क्लब यांच्याशी निगडित कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वयोगटाला योग्य असे विविध उपक्रम विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या सहकार्याने राबवण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी व पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर यांनी मार्गदर्शन केले. समिती प्रमुख प्रा. विस्मया कुलकर्णी व इतर सहकारी शिक्षकांनी या सप्ताहाच्या नियोजनाचे कार्य पाहिले.
Scroll to Top