अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची सिमेन्स कंपनीत औद्योगिक क्षेत्रभेट
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील कॉम्प्युटर सायन्स व इलेक्ट्रॉनिक्स विभागातील विद्यार्थ्यांची औद्योगिक क्षेत्र भेट गोवा येथील सिमेंस कंपनीच्या कारखान्यामध्ये आयोजित करण्यात आली होती. दोन्ही विभागातील एकूण 40 विद्यार्थ्यांनी या औद्योगिक क्षेत्र भेटीमध्ये सहभाग घेतला होता.
सदर औद्योगिक क्षेत्र भेटीमध्ये विद्यार्थ्यांना सिमेन्स कंपनीच्या इलेक्ट्रिकल रीलेच्या उत्पादनाविषयी सखोल माहिती कंपनीतर्फे देण्यात आली, कंपनीचे ग्लोबल कस्टमर केअर हेड (इंडिया) श्री विश्वास गुरव यांनी विद्यार्थ्यांना ट्रान्समिशन लाईन सेफ्टी ग्रीड ची विस्तृत माहिती देताना इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या क्षेत्राबाबत सखोल मार्गदर्शन केले.
तसेच विद्यार्थ्यांनी गोवा विज्ञान केंद्राला भेट दिली व तेथील विविध मॉडेल्स मधून शैक्षणिक संकल्पना समजून घेतल्या.
सदर औद्योगिक क्षेत्रभेट महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर सर, उपप्राचार्य श्री गोसावी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सौ सीमा फळणीकर मॅडम, सौ रश्मी जोशी मॅडम, सौ आदिती जोशी मॅडम, श्री कांदळकर सर व श्री नागवेकर सर यांनी सदर औद्योगिक क्षेत्रभेट आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.