अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वेबसाईटचे उद्घाटन संपन्न

अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वेबसाईटचे उद्घाटन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या शुभहस्ते महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी पार संपन्न झाले. वेबसाईट तयार करण्याची जबाबदारी गद्रे इन्फोटेक रत्नागिरी यांना दिली होती. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते गद्रे इन्फोटेक मधील कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

महाविद्यालयाचे शिक्षक प्रा. मकरंद दामले यांनी वेबसाईट तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न केले; यावेळी बोलताना वेबसाईट तयार करण्यामागचे महत्व त्यांनी सांगितले. https://www.akjcrtn.ac.in/ ह्या लिंक द्वारे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या वेबसाईटला भेट द्यावी असे आवाहन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी आहे.
Scroll to Top