अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात 'क्रॅक द मॅप' स्पर्धेचे आयोजन
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात वसुंधरा जिज्ञासा मंडळाच्यावतीने (भूगोल विभाग) शनिवार दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी ‘क्रॅक द मॅप’ या नकाशावर आधारित स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे उद्घाटन कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी सर यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. श्री दत्तात्रय वालावलकर सर हे उपस्थित होते .याप्रसंगी भूगोल अभ्यासकाचे नकाशा हे एक शस्त्र आहे तसेच नकाशामुळे भूगोल विषय कसा सुलभ पद्धतीने शिकता येतो याविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रा. गोसावी सरांनी मार्गदर्शन केले आणि नकाशा स्पर्धेतील स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. वालावलकर यांनी आपल्या महाविद्यालयात प्रथमच नकाशावर आधारित स्पर्धा संपन्न होत असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यात आणि स्पर्धा परीक्षेसाठी नकाशाचा कसा उपयोग करून घेता येईल याविषयी सविस्तरपणे मार्गदर्शन केले.
त्यानंतर ‘क्रॅक द मॅप’ स्पर्धा, नकाशा भरणे ,नकाशा वाचन आणि नकाशा जिगसॉ या तीन फेऱ्यांमध्ये घेण्यात आली. या स्पर्धेकरिता कला व विज्ञान विभागातील एकूण 54 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पहिल्या तीन क्रमांकाच्या स्पर्धकांना भूगोल दिनाच्या दिवशी (१४ जानेवारी) सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या स्पर्धेच्या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन कु. सानिका पांचाळ हिने तर आभार कु. सानिया खाडे हिने मानले. वसुंधरा जिज्ञासा मंडळाचे मुख्य समन्वय प्रा. दत्तात्रय माळवदे आणि डॉ. राजेश कांबळे यांनी उत्कृष्टरित्या या स्पर्धांचे आयोजन केले होते. तसेच प्रा. गायकवाड मॅडम, प्रा. सुमेध मोहिते, प्रा. दिलीप जाधव, प्रा. सुनील भोईर आणि प्रा. भोसले मॅडम या सर्वांचे सहकार्य या स्पर्धेला लाभले.