अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन संपन्न

मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर 2024 ला अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या मार्गदर्शनानुसार आणि उपप्राचार्य श्री. सुनील गोसावी तसेच पर्यवेक्षक श्री विद्याधर केळकर यांच्या उपस्थितीत संविधान दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. दिनविशेष समितीच्या प्रमुख विस्मया कुलकर्णी यांनी देशाच्या एकूण प्रगतीत संविधानाचे असलेले महत्त्व स्पष्ट केले. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तिन्ही मुल्यांबद्दल विद्यार्थ्यांना अधिक माहिती दिली. तसेच उपप्राचार्य श्री गोसावी यांनी विद्यार्थ्यांना संविधानाविषयी सखोल माहिती करून घ्यावी असे आवाहन केले. उत्तम नागरिक होण्यासाठी एक नागरिक म्हणून हक्क आणि कर्तव्य या दोन्हींविषयी योग्य जाण निर्माण करण्याचेही आवाहन केले. सर्व विद्यार्थ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे प्रकट वाचन केले.
 
 मनस्वी लांजेकर यांनी सूत्रसंचालन केले. तसेच आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दिनविशेष समितीच्या सर्व सदस्यांचे उत्तम सहकार्य लाभले.
Scroll to Top