रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात संपन्न
दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिनविशेष समितीच्या प्रमुख सौ. विस्मया कुलकर्णी मॅडम यांनी आपले विचार मांडले, डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली आणि शिक्षकांचे आपल्या जीवनातील महत्व स्पष्ट केले.याप्रसंगी महाविद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री.दत्तात्रेय वालावलकर यांनी देखील शिक्षकांचे महत्व स्पष्ट करताना निसर्ग सुद्धा आपल्याला खूप गोष्टी शिकवत असतो यावर प्रकाश टाकला. प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांनी देखील शालेय जीवनातील शिक्षकांचे योगदान आणि शिक्षकांची विद्यार्थ्यांकडून असलेली अपेक्षा स्पष्ट केली. उपप्राचार्य श्री सुनील गोसावी यांनी आपल्या भाषणात शिक्षकांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करताना आपल्या शालेय जीवनातील शिक्षकांच्या आठवणीना उजाळा दिला. महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. विद्याधर केळकर सर यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीमध्ये आणि वाणिज्य विभागाच्या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती असलेल्या भावना व्यक्त करणारे लेख ,कविता, चित्र इत्यादींचे एकत्रीकरण करून मान्यवरांच्या हस्ते भित्तिपत्रकाचे अनावरण करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. देवकुळे मॅडम यांनी केले.कार्यक्रमाचे नियोजन माननीय प्राचार्य डॉ.मकरंद साखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनविशेष समितीच्या सर्व सदस्यांनी केले.



