वाणिज्य शाखा

वाणिज्य विभाग हा अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनचा एक भाग आहे. विद्यार्थ्यांना औद्योगिक आस्थापनामध्ये योग्य त्या नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने तसेच विद्यार्थ्यांना वाणिज्य विभागात पुढील व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी मदत व्हावी या उद्देशाने त्याची स्थापना झाली होती. प्रारंभीच्या काळात वाणिज्य विभागाच्या केवळ दोन तुकडे होत्या. परंतु वाढत्या मागणीमुळे या तुकड्यांची संख्या आता सहा झाली आहे. तसेच हा अभ्यासक्रम इंग्रजी व मराठी मधून उपलब्ध करून देण्यात आला आहे. या विभागाचा गुणात्मक निकाल हा कायमच दर्जेदार राहिला आहे. बदलत्या कालानुरूप वाणिज्य विभागाच्या अभ्यासक्रमामध्ये विविध बदल करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना बदलत्या औद्योगिक व आर्थिक बदलानुसार व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी तयार करण्यासाठी सदर अभ्यासक्रम हा मूलभूत विषयांची तयारी व त्याचे आकलन यासाठी उपयुक्त ठरत आहे. औद्योगिक क्षेत्राचे मूलभूत विभाग म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच अभियांत्रिकी व पैशाचे व्यवस्थापन म्हणजेच वाणिज्य शाखा. या महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी सीए, CS तसेच आर्थिक व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. प्रचलित अभ्यासक्रमाशिवाय विद्यार्थ्यांना सतत बदलणाऱ्या औद्योगिक विश्वामधील आर्थिक नियोजनाचे महत्त्व व माहिती देण्यासाठी विविध जसे की प्रा. शंकर ढोले यांच्या कल्पनेतून सुरु झालेला शंकररावं ढोले students enrichment cell .या सेलमार्फत विविध उद्योजकांना बोलावले जाते तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. सदर शाखेमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे सुप्त गुण ओळखून त्यांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आर्थिक क्षेत्रामध्ये जाणकार व्यक्तिमत्व म्हणून तयार करण्यासाठी या विभागाचे सर्व शिक्षक सदैव कटिबद्ध आहेत.