अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी




दिनांक 14 एप्रिल: अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मूलमंत्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवताना प्रास्ताविकामध्ये दिनविशेष समिती प्रमुख सौ. विस्मया कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचं अभ्यास प्रेम आणि वाचन प्रेम समजावून सांगितले आणि या दोन गोष्टींमुळे आपल्या देशाला एक महामानव आणि भारतरत्न मिळालं हे पटवून सांगितलं. विद्यार्थ्यांनी त्यांना समजलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर आपल्या शब्द रूपामध्ये मांडण्याचा छान प्रयत्न केला.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सहकार्यवाह आणि एम. सी. व्ही. सी. विभागाचे प्रमुख श्री. श्रीकांत दुदगीकर यांनी रिझर्व बँक आणि भारतीय संविधानाचा उल्लेख करून डॉ .बाबासाहेब आंबेडकर नीटपणे समजून घेण्यासाठी त्यांनी लिहिलेली पुस्तके वाचणे अत्यावश्यक आहे असे सांगितले. याचबरोबर मा. उपप्राचार्य श्री. सुनील गोसावी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी योग्य वेळी शिक्षणाचे महत्त्व ओळखून उपलब्ध संधीचा स्वतःच्या विकासासाठी फायदा करून घ्यावा आणि बाबासाहेबांसारखं महान कार्य करावं असं आवाहन केलं.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक श्री. विद्याधर केळकर तसेच कला शाखेचे विभाग प्रमुख श्री. वैभव कानिटकर, विज्ञान शाखेचे विभागप्रमुख श्री. दिलीप कुमार शिंगाडे तसेच वाणिज्य शाखेच्या विभागप्रमुख सौ. शिल्पा तारगावकर आणि सर्व वर्ग शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मनस्वी लांजेकर यांनी केले तर सौ. प्राजक्ता सुर्वे यांनी सर्व मान्यवरांचे आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.