एम.सी.व्ही.सी. इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी विद्यार्थ्यांची बारटक्के इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजी, रत्नागिरी येथे एज्युकेशनल व्हिजिट
एम. सी.व्हि.सी. विभाग
इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी शाखा
शनिवार दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी एम. सी.व्हि.सी. विभागातील इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी शाखेतील ११ वीच्या विद्यार्थ्यांची एज्युकेशनल व्हिजिट बारटक्के इन्स्टिट्युट ऑफ इन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजी रत्नागिरी येथे नेण्यात आली. तेथे विद्यार्थ्यांना विविध संगणक्याचे कोर्सेस जसे की एम एस सी आय टी, एक्स एल ग्राफिक डिझायनिंग, वेब डिझाईनिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कम्प्युटर हार्डवेअर आणि अनेक असे कोर्सेस जे इलेक्ट्रॉनिक्सच्या विविध अभ्यासक्रमाशी निगडीत आहेत तसेच नवीन येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स करिअर मधील आव्हानात्मक परिस्थितीत विषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
या एज्युकेशनल व्हिजिट साठी बारटक्के इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजी श्री अमित पालकर सर, सौ. रसिका पालकर , श्री. अमृत कोळवणकर आणि श्री. अभिजीत भाट्ये यांनी मार्गदर्शन विद्यार्थ्यांना दिले. तसेच यावेळी एमसीव्हीसी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी शाखेतील प्राध्यापक श्री.योगेशानंद हळबे सर उपस्थित होते