अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा संपन्न

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिनविशेष समितीच्या प्रमुख सौ. विस्मया कुलकर्णी यांनी विचार मांडले, त्यांनी आपल्या भारतीय संस्कृतीत गुरू शिष्य परंपरा आणि त्याचे आधुनिक युगातले महत्व स्पष्ट केले.महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. विद्याधर केळकर सर यांनी व्यासपौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा याविषयी माहिती दिली.कार्यक्रमात एम सी व्ही सी विभागाच्या श्रावणी कामतेकर, उमेश प्रजापत, अथर्व सावंत, मारिया भाटकर, श्रुती तिर्लोटकर, इफ्रा अगरहेद, रफा डावे आणि पूजा प्रजापत या विद्यार्थ्यांनी कविता आणि भाषणाच्या माध्यमातून गुरुजनांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. तसेच आपल्या सृजनशीलतेतून साकारलेली विविध भेट कार्ड देऊन शिक्षकांप्रती असलेली कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . मकरंद साखळकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा .श्री सुनील गोसावी यांनी पौराणिक कथांमधून गुरुपौर्णिच्या दिवसाचे महत्व स्पष्ट केले.एमसीव्हीसी विभागाचे विभाग प्रमुख प्रा.श्रीकांत दुदगीकर आणि कनिष्ठ महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान या विभागातील विभाग प्रमुख यांनी देखील याप्रसंगी गुरुपौर्णिमा या विशेष दिनानिमित्त आपले विचार मांडले. तसेच विद्यार्थ्यांनीही आपआपल्या वर्गामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त आपले विचार मांडले आणि सर्व गुरुजनांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे अतिशय नेटके नियोजन दिनविशेष समितीच्या प्रमुख प्रा. सौ विस्मया कुलकर्णी आणि अन्य समिती सदस्य यांनी यशस्वीपणे पार पाडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. क्षितिजा यादव यांनी केले.
Scroll to Top