अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न
गुरुवार दि. १० जुलै : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत दिन विशेष समिती प्रमुख सौ. मनस्वी लांजेकर यांनी आपल्या भारतीय संस्कृतीत गुरु शिष्य परंपरा आणि त्याचे आधुनिक युगातले महत्त्व स्पष्ट केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कविता, शायरी आणि भाषणाच्या माध्यमातून गुरुजनांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. अध्यक्षीय समारोपामध्ये उपप्राचार्य श्री. सुनील गोसावी यांनी विद्यार्थ्यांना गुरूंचे महत्व सांगताना विद्यार्थ्यांची जबाबदारी देखील अधोरेखित केली आणि गुरु ज्ञानाच्या प्रकाशाने जीवनाची दिशा दाखवणारे आहेत असे स्पष्ट केले. कार्यक्रमाला पर्यवेक्षक श्री. विद्याधर केळकर व कला, वाणिज्य, विज्ञान आणि एम.सी.व्ही.सी. विभागातील विभाग प्रमुखांनी देखील या प्रसंगी गुरुपौर्णिमा या विशेष दिना निमित्त आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अदिती कोकजे तर आभार प्रदर्शन सौ. रोशनी हळदवणेकर यांनी केले. या कार्यक्रमाबरोबरच प्रत्येक वर्गात वर्गशिक्षक आणि वर्ग प्रतिनिधींच्या सहकार्याने कथा, कविता, भाषणे, शुभेच्छापत्रे इत्यादी विविध उपक्रमांद्वारे गुरुपौर्णिमा कार्यक्रम साजरा करण्यात आला.