अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिन संपन्न

International-Minority-Day

अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिन संपन्न रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक18 डिसेंबर 2024 रोजी आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मकरंद साखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य श्री. सुनील गोसावी आणि पर्यवेक्षक श्री. विद्याधर केळकर यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमांमध्ये रसायनशास्त्राचे ज्येष्ठ शिक्षक श्री. हमीद नांदगावकर यांनी अल्पसंख्यांकांच्या हक्कांबाबत विवेचन केले. याचबरोबर विद्यार्थ्यांना उपयुक्त अशा अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती संदर्भात विस्तृत स्वरूपात माहिती दिली. तसेच दिनविशेष समितीच्या प्रमुख सौ. विस्मया कुलकर्णी यांनी विविधतेमध्ये एकता जपणाऱ्या भारतामध्ये अल्पसंख्याकांची भूमिका खूप महत्त्वाची असते हे सांगताना त्यांनी’भारत आणि अल्पसंख्यांकांचे हक्क’ याविषयी विवेचन केले.

कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. सुनिल गोसावी यांनी समाजामध्ये आज पर्यंत चालत आलेले वांशिक, धार्मिक, जातीय, भाषिक भेद नष्ट करून एक दिलाने काम करण्यासाठी विद्यार्थ्यांनी या भेदांच्या पलीकडे जाऊन स्वतःचं व्यक्तिमत्व घडवावं हा विचार अनेक दैनंदिन उदाहरणे देऊन आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केला. या दिनानिमित्त कनिष्ठ महाविद्यालयामध्ये
वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. 

या स्पर्धेमध्ये कला शाखेतील कु. आफ्रिन इरफान डोंगरकर या बारावीतील विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक प्राप्त केला. बारावी विज्ञानच्या कु. झायना जुबेर अली मुल्ला या विद्यार्थिनीने द्वितीय तर कु.आयत नदीम शिरगावकर या बारावी कला शाखेतल्या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक प्राप्त केला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उर्दू विभागाच्या शिक्षिका सौ. अम्रीन बुड्ये यांचे विशेष सहकार्य लाभले. सूत्रसंचालन सौ. मनस्वी लांजेकर यांनी केले.

Scroll to Top