अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष: IQAC
IQAC चे प्रमुख ध्येय आहे: ‘संस्थेच्या सर्वांगीण उत्तम कामगिरीत वृद्धी होण्यासाठी एक सजग, अविरत आणि उत्प्रेरक प्रणाली निर्मित करून ती कार्यरत ठेवणे.’
IQAC ची प्रमुख उद्दिष्टे आणि कार्ये पुढील प्रमाणे:-
IQAC ची प्रमुख उद्दिष्टे आणि कार्ये पुढील प्रमाणे:-
- मूल्यमापन प्रक्रियेची विश्वासार्हता उच्च दर्जाची राखणे.
- 'गुणवत्ता-संस्कृती' च्या अंतर्गतीकरणाद्वारे गुणवत्ता सुधार करणे.
- आंतरशाखीय अध्यापनाद्वारे गुणवत्तेच्या पैलूंचा प्रसार करणे.
- संस्थेअंतर्गत गुणवत्तावृद्धी साठी संस्थेच्या कामकाजात नाविन्यपूर्ण उपायांना प्रोत्साहन देणे.
- अध्ययन-अध्यापनाच्या नाविन्यपूर्ण पद्धतींना अंगीकारून, त्यांच्या अध्ययन निष्पत्तींचा ठराविक कालांतराने आढावा घेणे.
- विद्यार्थी सहाय्यता प्रणालीत सुधारणा होण्यासाठी, एक कृती-योजना निर्मित करून तिची कार्यवाही करणे.
- प्रत्येक विभागाच्या गुणवत्तेचा आढावा घेऊन व तपासणी करून त्याचा अहवाल तयार करणे.
- कार्यरत असलेल्या विविध विद्याशाखांमधील परस्पर संवाद व सहकार्य वृद्धिंगत करणे.
- विविध विद्याशाखांमधील विविध विभागांमध्ये असलेले संप्रेषण-अंतर नाहीसे करण्यासाठी, परस्पर सहभाग व सहयोग वाढेल अशी कार्यप्रणाली राबविणे.
- व्यावसायिक किंवा प्रत्यक्ष कार्यक्षेत्रातील अनुभव विद्यार्थ्यांना देऊन, शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्यामध्ये कौशल्य निर्मिती होईल असे पाहणे.