एम. सी.व्हि.सी. विभाग - शैक्षणिक भेट

अभ्यंकर कुलकर्णी जूनियर कॉलेज रत्नागिरी
एम. सी.व्हि.सी. विभाग इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी शाखा
गुरुवार दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी एम. सी.व्हि.सी. विभागातील इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी शाखेतील ११ वीच्या विद्यार्थ्यांची एज्युकेशनल व्हिजिट बारटक्के इन्स्टिट्युट ऑफ इन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजी रत्नागिरी येथे नेण्यात आली. तेथे विद्यार्थ्यांना संगणक, नेटवर्किंग हार्डवेअर आणि उपलब्ध असलेले इलेक्ट्रॉनिक्स शी निगडीत विविध अभ्यासक्रम तसेच नवीन येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स आव्हानात्मक परिस्थितीती विषयी सविस्तर माहिती दिली .
या एज्युकेशनल व्हिजिट साठी बारटक्के इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजी चे श्री अमित पालकर सर , सौ. रसिका पालकर मॅडम ,श्री. अमृत कोळवणकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्श केले. तसेच यावेळी एम. सी.व्हि.सी. विभागातील इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी शाखेचे प्राध्यापक श्री.योगेशानंद हळबे सर उपस्थित होते.