एम.सी.व्ही.सी. इलेक्ट्रॉनिक्स विद्यार्थ्यांनी घेतला अत्याधुनिक सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव
अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी
एम.सी.व्ही.सी. विभाग – इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी शाखा
मंगळवार, दिनांक 23 जून 2026 रोजी अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या एम.सी.व्ही.सी. विभागातील इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी शाखेच्या इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट (Educational Visit) सॅमसंग प्लाझा, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची कार्यपद्धती, तांत्रिक वैशिष्ट्ये आणि त्यामध्ये होत असलेल्या नव्या तांत्रिक बदलांची सविस्तर माहिती देण्यात आली. यामध्ये वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, स्मार्ट टेलिव्हिजन, AI आधारित टीव्ही, मायक्रोवेव्ह ओव्हन तसेच डॉल्बी साऊंड तंत्रज्ञानयुक्त साऊंड बार यांच्या विविध मॉडेल्सचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. विशेषतः आवाजरहित (Silent) वॉशिंग मशीन, स्मार्ट टीव्ही, AI टीव्ही आणि अत्याधुनिक साऊंड सिस्टिम्स यांविषयी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.
या शैक्षणिक भेटीदरम्यान सॅमसंग प्लाझाचे श्री. उल्हास लिमये तसेच त्यांचे सहकारी श्री. विशाल मिरुगुले आणि श्री. पराग नांदगावकर यांनी विद्यार्थ्यांना विविध इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची कार्यपद्धती, वैशिष्ट्ये आणि आधुनिक तंत्रज्ञानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या शैक्षणिक भेटीस महाविद्यालयातील प्रा. श्री. योगेशानंद हळबे, श्रीमती प्रियांका खंडकर आणि श्री. सुनील बांदेकर उपस्थित होते. या शैक्षणिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील तांत्रिक संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून समजून घेण्याची तसेच आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञानाची ओळख करून घेण्याची मौल्यवान संधी मिळाली.


