पर्यावरण जाणीव जागृती अभियान मंडळ

पुढील काळात संपूर्ण पृथ्वी व सर्व प्रजातींच्या (मानवजाती सकट) संरक्षणासाठी महत्त्वाचे आहे ते म्हणजे पर्यावरण संवर्धन व यासाठीचे आवश्यक संस्कार पुढील पिढीत आणण्यासाठी व पर्यावरणासाठीचे प्रेम जागृत करण्यासाठी आपल्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातर्फे एक प्रयत्न…..

पर्यावरण जाणीव जागृती अभियान मंडळ प्रमुख उद्दिष्टे

१. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण प्रेम जागृत करणे.

२. विविध पर्यावरण समस्यांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती आणणे.

३. स्थानिक पर्यावरण अधिक चांगल्या प्रकारे समजावून देणे.

४. पर्यावरण संवर्धनात विद्यार्थ्यांना सामावून घेणे.

५. पर्यावरणीय संकल्पना समजावून देणे.

व्याख्याने – दरवर्षी पर्यावरण मंडळातर्फे पर्यावरण क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची व्याख्याने आयोजित केली जातात. त्यातून पर्यावरणातील संकल्पना, प्रश्न व तज्ञांनी स्वतः केलेले पर्यावरण संरक्षणाचे प्रयत्न विद्यार्थ्यांना कळतात. यामध्ये आपण विविध क्षेत्रातील डॉक्टरेट किंवा प्रोफेसर व पर्यावरण संवर्धकांना निमंत्रित करतो.

सहली – आपल्या कोकणातील देवराया, आपले किनारे, खारफुटींची वने व आपले सडे यांची माहिती प्रत्यक्ष सहलीमार्फत देण्याचा प्रयत्न आम्ही दरवर्षी आमच्या पर्यावरण जाणीव जागृती अभियान मंडळातर्फे करत आलो आहोत. आपला निसर्ग आपल्याला किती आणि काय काय देतो हे या सहलींमार्फत कळते. याचवेळी पर्यावरण स्वच्छतेचा धडा देखील दिला जातो.

माहितीपट दाखवणे – तसेच विविध संकल्पना, संवर्धन कृती, परिसंस्था समजण्यासाठी पर्यावरणीय माहितीपट व चित्रफिती देखील दाखविल्या जातात.

पर्यावरणीय दिन – विविध पर्यावरणासंबंधी दिन जसे पर्यावरण दिन, सागर दिन, खारफुटी दिन, व्याघ्र दिन वन्यजीव सप्ताह, पक्षी सप्ताह, पाणथळ दिन विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन साजरे केले जातात. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेले लेख, चित्रे विद्यार्थी देतात. तसेच सागर दिनाला तर समुद्र साफसफाई देखील केली जाते.

स्पर्धा – विविध पर्यावरणीय स्पर्धा ज्या वनविभाग किंवा अशासकीय संस्था (NGO) यांकडून येतात त्यातही आपलीच मुले चमकतात. पर्यावरण मंडळातर्फे दरवर्षी आपण photography (छायाचित्र) स्पर्धा आयोजित करतो. यासाठी पाणथळ जागा, सडे, पक्षी, निसर्गातील रंगसंगती असे विविध विषय आपण देतो व मुलांना अधिक निसर्गाच्या जवळ येण्यास, निरीक्षण करण्यास व निसर्गावर प्रेम करण्यास उद्युक्त करतो.

श्रीम. एस. जे. पाथरे (समन्वयक)

९४२२६३०७५७

Scroll to Top