रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर -कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या ‘सहकार’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या ‘सहकार’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन दरवर्षीप्रमाणे 26 जानेवारी 2025 रोजी संपन्न झाले. मान्यवरांच्या हस्ते सहकाराचे ईबुकही प्रकाशित झाले असून महाविद्यालयाच्या वेबसाईटवर आपला ‘सहकार’ उपलब्ध आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी ,संस्कृत आणि उर्दू या पाच भाषांमध्ये सहकारचे साहित्य स्वीकारले गेले आणि विद्यार्थी आणि शिक्षकांचे उत्तम लेख, कथा, कविता, एकांकिका, पुस्तक परीक्षण असे सर्वस्पर्शी साहित्य आणि अतिशय विलोभनीय व सुंदर चित्रे यांचा समावेश ‘सहकार’मध्ये आहे. यावर्षीच्या ’सहकार’ ची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे उत्तम सचित्र प्रभावासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापराने वापरण्यात आलेली सुंदर आणि देखणी चित्रे तसेच भारतातील महत्त्वपूर्ण आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वांबद्दलचे विशेष सदर ‘व्यक्ती विशेष -आयकॉनिक इंडियन्स’. असा हा सर्वांगसुंदर, वाचनीय, बोधप्रद तसेच मनोरंजक ‘सहकार’ नक्की वाचा खालील लिंकवर.