सुयश अकॅडमी

suyash-academy-logo

करिअर म्हटले की त्याची दिशा दहावी नंतरच ठरते. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याचा (जवळपास ८०% विद्यार्थ्यांचा) एकमुखी निर्णय असतो तो इजिनिअरींग, मेडीकल, फार्मसी किंवा अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याचा. या त्यांच्या मनातल्या सुप्त इच्छा आकांक्षाना खऱ्या अर्थाने रुप देण्यासाठी प्रवास सुरु होतो तो विद्यार्थी आणि पालकांचा.

शासन स्तरावर बदललेल्या शैक्षणिक धोरणानुसार २००० सालापासून १२ वी नंतर पुढील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी NEET/JEE/MHT-CET या प्रवेश परीक्षेंना फार महत्व प्राप्त झाले आहे. रेग्युलर कॉलेजमध्ये केवळ बोर्ड पॅटर्ननुसार Subjective तयारी करुन घेतली जाते. पण NEET/JEE/MHT-CET च्या दृष्टीने मार्गदर्शन देणे हा विषय चालू परिस्थितीचा अंदाज घेतला तर बदलत्या काळाची गरज म्हणून अत्यंत गरजेचा आहे.

प्रत्येक ट्रेड्नुसार असणारा विद्यार्थ्यांचा मर्यादीत कोटा व त्यामानाने तुलनात्मक मोठ्या प्रमाणावर असणारी विद्यार्थ्यांची संख्या या सर्व प्रकारात कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची निकड तसेच राष्ट्रीय पातळीवरील विद्यार्थ्यांची होणारी चढाओढ यामध्ये आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा निभाव लागावा, राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावरील विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत NEET/JEE/MHT-CET चे आव्हान पेलण्याची क्षमता, आपल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अंगी यावी, यासाठी विद्यार्थी हा केंद्र बिंदू मानून त्याच्या विकासासाठी / गुणवत्तेसाठी नाविन्याची आस धरणाऱ्या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने, अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात NEET/JEE/MHT-CET मार्गदर्शनाकरिता सुयश अकॅडमी सुरू केली आहे. जेणेकरून दोन वर्षात पूर्णतः तयारी होऊन जास्तीत जास्त स्कोअर करता येईल व आपल्याला व्यावसायिक करिअरसाठी अभिप्रेत असणाऱ्या ट्रेडसाठी अॅडमिशन मिळू शकेल. विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास साधणे आणि त्याला नवीन ओळख देणे हा रत्नागिरीतीलच नव्हे तर संपूर्ण कोकणातील नामांकित शिक्षण संस्था म्हणून रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचा परिचय आहे.

महाविद्यालयामध्ये चालविल्या जाणाऱ्या या वर्गाचे स्वतंत्र विशेष नियोजन असते. यासाठी महाविद्यालयातील कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील निवडक तज्ज्ञ शिक्षकांकडून उत्तम मार्गदर्शन केले जाते. PCB साठी ३० आणि PCM साठी ३० अशी स्वतंत्र बॅच महाविद्यालयामध्ये चालविली जाते. यामध्ये NEET/JEE/MHT-CET ची विशेष तयारी करुन घेतली जाते. भरपूर सराव साहित्य, तज्ज्ञ प्राध्यापक वर्गाने तयार केलेल्या प्रिंटेड नोटस, अंतिम परिक्षांच्या स्वरुपावर आधारीत सराव परीक्षांची, “कोटा राजस्थान मधील Zap Learning Solutios ची” गुणवत्तापूर्ण टेस्ट सिरीज तसेच गेस्ट लेक्चरर्स, Audio Visual माध्यमाच्या योग्य वापर, वैयक्तिक शंका सामाधान, उच्च दर्जाच्या अद्ययावत मार्गदर्शक पुस्तकांची स्वतंत्र लायब्ररी या पध्दतीने अत्यंत माफक फी मध्ये नियमित वेळापत्रकाप्रमाणे NEET/JEE/CET मार्गदर्शन केंद्र सुव्यस्थितपणे चालविले जाते. यातील विद्यार्थी प्रवेश हा मर्यादितच असतो. प्रतिवर्षी लागणारा निकाल हा उत्साहवर्धक व भूषणावह असाच आहे, या संदर्भातील नियोजन प्रतिवर्षी काळजीपूर्वक केले जाते. महाविद्यालयात CET मार्गदर्शनाची व्यवस्था २००८ पासून सुरु केल्यानंतर प्रतिवर्षी परीक्षेत उज्वल यशाची परंपरा या मार्गदर्शन वर्गाने राखली आहे. विद्यमान वर्ष २०२४ पासून NEET/JEE या विशेष स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन सुद्धा विद्यार्थ्यांना आपल्याच महाविद्यालयात (एकाच छताखाली) घेता येणार आहे. तरी संबधित विद्यार्थ्यांना या संधीचा उपयोग करुन घ्यायला हवा.

प्राचार्य

संपर्क

प्रा. चेतन मालशे, समन्वयक (८९९९३८९३७८)

श्री. रविंद्र कीर, व्यवस्थापक (९४२३८५६२६७)

Scroll to Top