सुयश अकॅडमीच्या फाउंडेशन कोर्सच्या विद्यार्थ्यांची इलेक्ट्रॉनिक्स विभागाला भेट
सोमवार दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी सुयश अकॅडमी च्या फाउंडेशन कोर्सच्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉनिक्स लॅबला भेट दिली.
यावेळी त्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स विभागातील विविध शाखेमधील करिअर विषयी माहिती करून देण्यात आली. यामध्ये त्यांना इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन , इलेक्ट्रॉनिक्स टेलिकामुनिकेशन , रोबोटिक्स, एमबेडेड सिस्टिम, व्हिएलएसआय डिझाईन , कम्प्युटर ,सॉफ्टवेअर , आयटी अशा विविध क्षेत्रातील माहिती करून देण्यात आली.
तसेच काही बेसिक गोष्टी दाखवण्यात आल्या जसे की ऑसिलोस्कोप, सिग्नल जनरेटर, विविध प्रकारचे मीटर्स, कम्प्युटर मदरबोर्ड, मायक्रोप्रोसेसर किट. जेणेकरून विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील काही गोष्टींची बेसिक माहिती होऊ शकेल.
यावेळी प्राध्यापक श्री प्रसाद गोखले यांनी विद्यार्थ्यांना रंजक पद्धतीने इलेक्ट्रॉनिक्स विषयी बेसिक गोष्टींची माहिती दिली . प्राध्यापक योगेशानंद हळबे यांनी डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर मदरबोर्ड मायक्रोप्रोसेसर किट याविषयीची माहिती दिली. तसेच प्राध्यापिका सीमा फळणीकर यांनी इलेक्ट्रॉनिक्स शाखा आणि कम्प्युटर्स सायन्स शाखेविषयी सविस्तर माहिती दिली जेणेकरून विद्यार्थ्यांना दहावीनंतर शाखा निवडताना अधिक सुलभता येईल.
