वसुंधरा जिज्ञासा मंडळ

अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात भूगोल विषयांतर्गत अभ्यास मंडळ सुरू करावे, असा विचार भूगोल विषय शिक्षक श्री. डी. एस. माळवदे आणि डॉ. आर. एस. कांबळे यांनी उपप्राचार्य माननीय श्री. सुनील गोसावी यांना बोलून दाखवला. त्याला लगेचच श्री. गोसावी सरांनी परवानगी दिली आणि मंडळ स्थापना करण्यासाठी मार्गदर्शन केले. डॉ. राजेश कांबळे यांनी या मंडळाला, “वसुंधरा जिज्ञासा मंडळ असे सुंदर नाव सुचवले.

दिनांक ५ जुलै, २०२४ रोजी वसुंधरा जिज्ञासा मंडळाची कार्यकारिणी निवडण्यात आली. दिनांक ८ जुलै, २०२४ रोजी सकाळी ११ वा. ४५ मिनिटांनी उपप्राचार्य  कक्षात, मंडळाच्या उद्घाटनाचे नियोजन करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली. या सभेला उपप्राचार्य. श्री. गोसावी सर, समन्वयक श्री. माळवदे सर, डॉ. राजेश कांबळे, श्री. डी. डी. जाधव, श्री. एस. एम. भोईर, श्रीम. वाय. वाय. गायकवाड, श्रीम. भोसले मॅडम इत्यादी सदस्य उपस्थित होते. या सभेमध्ये वसुंधरा जिज्ञासा मंडळाच्या उद्घाटन कार्यक्रमाविषयी चर्चा करण्यात आली. तसेच मंडळाचे उद्देश निश्चित करून व वर्षभरातील कार्यक्रमाविषयी चर्चा करण्यात आली. उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते  म्हणून श्री. श्रीवल्लभ साठे सर यांचे नाव ठरविण्यात आले.

दिनांक ११ जुलै, २०२४ रोजी सायंकाळी ०४ वा. सेमिनार हॉल येथे, लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून वसुंधरा जिज्ञासा मंडळाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ. मकरंद साखळकर यांनी भूषवले. डॉ. मकरंद साखळकर सर यांच्या हस्ते पृथ्वीगोलाचे पुजन करून आणि एका चित्रफीतीचे संगणकीय प्रणालीद्वारे वसुंधरा जिज्ञासा मंडळाचे उद्घाटन करण्यात आले.

त्यानंतर वसुंधरा जिज्ञासा मंडळाचे समन्वयक श्री. दत्तात्रय माळवदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यामध्ये त्यांनी लोकसंख्या दिनाचे महत्त्व सांगून वसुंधरा मंडळाची उद्दिष्टे सांगितली. त्यानंतर डॉ. राजेश कांबळे यांनी मंडळाकडून वर्षभरात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. श्रीवल्लभ साठे सर यांनी वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात कोणकोणत्या समस्या निर्माण होतात हे सुरेख उदाहरणाद्वारे स्पष्ट केले. संस्थेचे आजीव सदस्य मंडळाचे सचिव श्री. महेश नाईक सर यांनी या मंडळाद्वारे भौगोलिक ठिकाणांना भेटी देऊन भूगोल विषयक ज्ञान विद्यार्थ्यांमध्ये  कसे वृद्धिंगत करता येईल याची माहिती दिली.

अध्यक्षीय समारोपात माननीय डॉ. श्री. साखळकर सर यांनी महाविद्यालयात नव्याने सुरू होत असलेल्या वसुंधरा जिज्ञासा मंडळाचे समन्वयक श्री. माळवदे सर व डॉ. राजेश कांबळे सर आणि मंडळातील सर्व सदस्यांचे कौतुक केले. निसर्ग आपल्याला भरभरून देतो, परंतु मानव त्याचा वापर कसा करतो तसेच निसर्गातील आश्चर्यकारक गोष्टींची उदाहरणे विद्यार्थ्यांना सांगितली.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उप प्राचार्य श्री. सुनील गोसावी, संस्थेचे आजीव सदस्य मंडळाचे सचिव श्री. महेश नाईक सर, संस्थेचे आजीव सदस्य श्री. तेंडुलकर, वसुंधरा जिज्ञासा मंडळाचे सदस्य श्री. जाधव, श्री. सुनील भोईर, श्रीम. गायकवाड मॅडम, श्रीम. भोसले मॅडम, श्रीम. बुडये मॅडम उपस्थित होत्या.

वसुंधरा जिज्ञासा मंडळ स्थापन करण्यासाठी उपप्राचार्य श्री गोसावी सर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लागले. या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन डॉ. कांबळे यांनी केले तर श्री. डी .डी .जाधव यांनी आभार मानले.

श्री. डी. एस. माळवदे (समन्वयक)

९६२३११९२०४

Scroll to Top