दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पारंपारिक चौकटीबाहेरचं शिक्षण – ऑफलाईन प्रवेशासह व्होकेशनल अभ्यासक्रमांची नवी ओळख
अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय येथे व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांद्वारे नोकरी व व्यवसायासाठी सक्षम विद्यार्थी घडवले जात असून, १००% निकालासह कौशल्याधारित शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध आहे.
दहावी (शालांत परीक्षा २०२६) उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर पुढील शिक्षणाचा महत्त्वाचा टप्पा उभा राहतो. पारंपारिक कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांसोबतच आजच्या स्पर्धात्मक युगात कौशल्याधारित व व्यवसायाभिमुख शिक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. रोजगार व स्व-उद्योजकतेच्या संधी लक्षात घेता, योग्य शाखेची निवड करणे हे पालक व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय हे महाविद्यालय गेली ३० वर्षे, +२ स्तरावरील व्होकेशनल (MCVC) अभ्यासक्रम यशस्वीरित्या राबवत असून या अभ्यासक्रमाची १५ वर्षांची १००% निकालाची परंपरा जपली आहे. हे महाविद्यालय R. E. Society या नामांकित संस्थेचे असून कोकणातील एक प्रतिष्ठित शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते.
विशेष म्हणजे हे महाविद्यालय गोगटे जोगळेकर महाविद्यालय (७५ वर्षांची परंपरा) याच परिसरात कार्यरत असल्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय ते उच्च शिक्षणापर्यंत एक सलग आणि विश्वासार्ह शैक्षणिक वातावरण उपलब्ध होते.
ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील बदल आणि विद्यार्थ्यांसाठी संधी:
यावर्षीपासून अकरावीचे सर्व प्रवेश ऑनलाईन पद्धतीने मेरिटनुसार दिले जात असले तरी अनेक वेळा विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळणे कठीण ठरते.
मात्र, व्होकेशनल अभ्यासक्रमांसाठी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया उपलब्ध असून त्याची मेरिट लिस्ट महाविद्यालय स्तरावर तयार केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना इच्छित महाविद्यालयात प्रवेश मिळवण्याची संधी अधिक सुलभ होते.
उपलब्ध अभ्यासक्रम:
- Accounting and Office Management (AOM)
वाणिज्य गटातील हा अभ्यासक्रम Accounting, Costing, Auditing व Office Management यांसारख्या विषयांवर आधारित असून विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक गुण निर्माण करतो तसेच B.Com, CA, CS, BBA, BAF, Law यांसारख्या उच्च शिक्षणासाठी तयार करतो. - Logistic and Supply Chain Management (LSM)
Retail, Warehousing व Logistics क्षेत्रातील वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आधुनिक उद्योग क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध करून देतो. तसेच ह्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी वाणिज्य विषयातील उच्च शिक्षण घेऊ शकतो. - Medical Laboratory Technology (MLT)
वैद्यकीय क्षेत्रातील हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना Anatomy, Microbiology, Biochemistry यांसारख्या विषयांमध्ये प्रात्यक्षिक ज्ञान देतो आणि उपवैद्यकीय क्षेत्रात करिअरच्या संधी निर्माण करतो. - Electronics Technology (ET)
अभियांत्रिकी गटातील हा अभ्यासक्रम Electronics, Hardware, Networking व Communication Systems यामध्ये कौशल्य विकसित करून विद्यार्थ्यांना नोकरी तसेच स्वयंरोजगारासाठी सक्षम बनवतो.
अभ्यासक्रमांची ठळक वैशिष्ट्ये:
- ७०% प्रात्यक्षिक कौशल्याधारित शिक्षण
- प्रत्येक गटात मर्यादित ३० विद्यार्थी – वैयक्तिक लक्ष
- HSC Board मार्फत बारावी परीक्षा
- On Job Training (OJT) व Industrial Visits
- तज्ञांचे मार्गदर्शन (Guest Lectures)
- शासकीय Apprenticeship योजना लागू
- शासकीय फी सवलती व इतर लाभ
- HSC Board व Vocational Department कडून प्रमाणपत्र
पुढील शिक्षणाची हमी:
या महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी इन-हाऊस प्रवेश सुविधा उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना थेट गोगटे जोगळेकर महाविद्यालय मध्ये प्रवेश मिळण्याची संधी असल्यामुळे त्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होतो.
आजच्या युगात केवळ पारंपारिक शिक्षण पुरेसे नसून कौशल्याधारित शिक्षणाची गरज वाढत आहे. व्होकेशनल अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच रोजगार व व्यवसायासाठी सक्षम बनवतात.
अनुभवी परंपरा, आधुनिक अभ्यासक्रम, ऑफलाईन प्रवेशाची सुविधा आणि पुढील शिक्षणाची खात्री यामुळे अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय हे विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम आणि विश्वासार्ह पर्याय ठरत आहे.
संपर्क:
अधिक माहिती साठी अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क करावा किंवा खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करावा.
- प्रा. श्री. श्रीकांत दुदगीकर (HOD Vocational Department & Joint Secretary) – 8208668865
- प्रा. श्री. योगेशानंद हळबे (ET) – 9890827006
- प्रा. श्रीमती रिद्धी हजारे (AOM) – 9130634394
- प्रा. श्रीमती गायत्री पवार (LSM) – 9423290084
- प्रा. स्नेहा पेवेकर (MLT) – 8329923324
